प्रीपेड रिचार्ज, वीज आणि पुस्तकांच्या दुकानांसह सरकारने कुठे दिली सूट... वाचा संपूर्ण यादी

याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण देण्याचे आवाहन गृहमंत्रालयाने विविध राज्यांना केले आहे.



नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गृह मंत्रालयाच्या  सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची गती राखण्यासाठी कृषीसंदर्भातील कामांना परवानगी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना सांभाळण्याचं काम करणाऱ्या सेविका यांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.


या क्षेत्रांना देण्यात आली आहे सूट


त्याशिवाय शहरातील प्रीपेड मोबाइल रिचार्ज दुकाने, दूध व ब्रेड फॅक्टरी तसेच डाळी व पीठ गिरण्यांना सूट देण्यात आली आहेत. पुस्तके आणि विद्युत वस्तूंच्या दुकानांनाही सूट देण्यात आली आहे. पुण्य सलीला श्रीवास्तव म्हणाले की, रस्ता बांधकाम आणि वीटभट्ट्यावरील कामेही सुरू होतील. आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण देण्याचे आवाहन गृहमंत्रालयाने विविध राज्यांना केले आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होत असेल तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जावी.


शात 24 तासांत 1409 नवीन प्रकरणे


आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1409 रुग्ण आढळले आहेत. संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 21,393 वर पोहोचली आहे. शिवाय  कोविड – 19 चे संक्रमित 4257 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, ही आकडेवारी 19.89 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) रुग्णसंख्येने 21000 टप्पा पार केला असून मुंबईतील (Mumbai) धोका कायम आहे. आज मुंबईत कोरोनाचे (Covid -19) 522 रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता येथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार गेली आहे.