लॉकडाऊनमध्ये अनिता राज यांच्या घरी पाहुणे आल्यानं सोसायटीच्या सेक्युरिटीनं पोलीसांना याबाबतची माहिती दिली होती.
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसमुळे देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं. सरकारकडून सतत सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवहन करण्यात येत आहे. लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच सर्वांना घरातच राहणं सक्तीचं करण्यात आलं आहे. अशात प्रसिद्ध अभिनेत्री अनिता राज हिच्यावर लॉकडाऊनमध्ये पार्टी करण्याचा आरोप केला गेल्यामुळे पोलीस तिच्या घरी पोहोचले. लॉकडाऊन असताना अभिनेत्रीच्या घरी पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि यात त्यांचे जवळचे मित्र सहभागी झाल्याची माहिती पोलीसांना देण्यात आली होती.
अनिता राजच्या सेक्युरिटीनं पोलीसांना याविषयीची माहिती दिली होती. ज्यानंतर पोलीस चौकशीसाठी तिच्या घरी पोहोचले. त्यानंतर आता अनीता राज आणि तिच्या पत्नी सेक्युरिटीवरचं खोटी माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. याबाबत पुणे मिररशी बोलताना अनिता राज म्हणाल्या लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याची खोटी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. ज्यामुळे पोलीस आमच्या घरी पोहोचले होते.
अनिता राज म्हणाल्या, माझा नवरा डॉक्टर आहे. अशात त्यांचा एका मित्र मेडिकल इमरजन्सीमुळे आपल्या पत्नीला घेऊन आमच्या घरी पोहोचला होता. डॉक्टर असल्याच्या नात्यानं माझा नवरा त्यांना नकार देऊ शकला नाही. मात्र पोलीसांना याबाबत चुकीची माहिती देण्यात आली होती. ज्यामुळे पोलीस आमच्या घरी पोहोचले. सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पोलीसांनी याबाबत माफी सुद्धा मागितली.
मीडिया रिपोर्टनुसार लॉकडाऊन असतानाही अनिता राज यांच्या सोसायटीमध्ये बाहेरच्या व्यक्तीला येण्यास सक्त मनाई आहे. अशात अनिता राज यांच्या घरी पाहुणे पोहोचल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्यामुळेचं सोसायटीच्या सेक्युरिटीनं पोलीसांना याबाबतची माहिती दिली होती.